उद्दिष्टे आणि कार्य
महामंडळाची उद्दिष्टे व कार्ये
शासन निर्णय दि. ०४ ऑक्टोबर २०२४ अन्वये जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची खालील उद्दिष्टे व कार्ये निश्चित करण्यात आली आहेत:
०१. सामाजिक सक्षमीकरण
राज्यातील जैन समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे.
०२. स्वयंरोजगार कर्ज सहाय्य
जैन समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसूली करणे.
०३. आर्थिक साधनसामुग्री पुरवठा
जैन समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
०४. साहित्य व सामुग्री सेवा
जैन समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
०५. कल्याणकारी योजना अंमलबजावणी
राज्यातील जैन समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.
०६. तीर्थ संरक्षण व संवर्धन
अतिप्राचीन जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन.
०७. ग्रंथ जतन व पुनर्लेखन
अतिप्राचीन जैन ग्रंथांचे संरक्षण, संवर्धन व पुनर्लेखन.
०८. साधू-संत विहार सुरक्षा
कायम पायी विहार करणाऱ्या जैन साधू संतांच्या विहारासाठी सुरक्षा.
०९. शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज व्यवस्था.
१०. विधवा/परित्यक्ता महिला योजना
जैन समाजाच्या विधवा, परित्यक्ता महिलांसाठी विशेष योजना.

