रु. १.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना
विनातारण, कमी व्याजदरात थेट कर्ज सुविधा
रु. १.०० लाख
कमाल कर्ज मर्यादा
निरंक
लाभार्थी सहभाग
४८ हप्ते
परतफेड कालावधी
रु. २,०८५
मासिक हप्ता (मुद्दल)
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- 1शासनाकडून प्राप्त भागभांडवलातून महामंडळ ही योजना राबवेल.
- 2रु. १.०० लक्षपर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
- 3लाभार्थीचा सहभाग निरंक राहील.
- 4४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु. २,०८५/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही.
- 5नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवर नोंदणी करा.
अर्जासाठी संपर्क साधा
