माननीय मंत्री व पदाधिकारी

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री महोदय

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री तथा मा. मंत्री, अ. वि. वि.

श्रीमती माधुरी मिसाळ

माननीय राज्यमंत्री

श्री. ललित गांधी

अध्यक्ष,
जैन अल्पसंख्याक विकास वित्त महामंडळ

श्रीमती डॉ माधवी खोडे चवरे

सचिव,
अल्पसंख्याक विकास विभाग

श्रीमती मेघना गौरव शिंदे

व्यवस्थापकीय संचालक,
जैन अल्पसंख्याक विकास वित्त महामंडळ

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ

जैन समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व विविध संघटनांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर जैन समाजातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून जैन समाजातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार व आर्थिक उन्नतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

जैन समाजातील सर्व पंथ व संप्रदायांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी महामंडळाच्या संचालक मंडळाची सदस्यसंख्या २१ करण्यात आली आहे.

तसेच, महामंडळाच्या नावातील “जैन समाज” हा उल्लेख वगळून अधिकृत नाव “जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ” असे करण्यात आले आहे.

महामंडळाच्या योजना

जैन समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज व व्याज परतावा योजना जाणून घ्या.

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.