गट कर्ज व्याज परतावा योजना
शेतकरी उत्पादक गट (FPO) व सामूहिक उद्योगांसाठी गट कर्ज व्याज परतावा
रु. १०–५० लाख
प्रति गट कर्ज मर्यादा
१२%
कमाल व्याज परतावा
रु. १५ लाख
व्याज परताव्याची कमाल मर्यादा
५ वर्षे
कमाल परतफेड कालावधी
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- 1शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवेल.
- 2बँकेकडून प्रती गटास कमीत कमी रु. १०.०० लक्ष ते जास्तीत जास्त रु. ५०.०० लक्षपर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणीकरिता कर्ज उपलब्ध.
- 3पात्र शेतकरी उत्पादक गटांना (Farmers Producers Organizations – FPO) रु. १०.०० लक्षपर्यंत विनाव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरिता देण्यात येईल.
- 4योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
- 5मंजूर कर्जावर ५ वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२% व्याज दराच्या आणि रु. १५.०० लाखाच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
- 6महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल.
- 7गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटास संगणकीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल; या आधारे गटाने बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जासाठी संपर्क साधा
