शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या बँक कर्जावरील व्याजाचा परतावा

रु. १० लाख
राज्य/देशांतर्गत अभ्यासक्रम
रु. २० लाख
परदेशी अभ्यासक्रम
१२%
कमाल व्याज परतावा

योजनेचा तपशील

जैन समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु. १०.०० लक्ष तसेच परदेशी अभ्यासक्रमासाठी रु. २०.०० लक्ष बँकेकडून कर्ज मंजूर केलेल्या रकमेवर कमाल १२% व्याज दरापर्यंत व्याज परतावा शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी बँकेकडून शैक्षणिक कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर महामंडळाशी संपर्क साधा.
अर्जासाठी संपर्क साधा

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.