वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

बँक कर्जावरील व्याजाचा परतावा थेट आधार लिंक बँक खात्यात

रु. १०.०० लाख
कर्ज मर्यादा
१२%
कमाल व्याज परतावा
पीएफएमएस
संगणकीकृत प्रणाली
१ व्यक्ती
प्रति कुटुंब पात्रता

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • 1शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवेल.
  • 2बँकेकडून कर्जमर्यादा रु. १०.०० लक्षपर्यंत असेल.
  • 3बँकेने रु. १०.०० लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
  • 4सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.
  • 5कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • 6वेबपोर्टल / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
  • 7कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार राहील.
या योजनेसाठी महामंडळाच्या वेबपोर्टलवर नोंदणी अनिवार्य आहे.
अर्जासाठी संपर्क साधा

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? महामंडळ आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.